
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक शुक्रवारी 797.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसा अखेर हा स्टॉक 8.82 टक्क्यांच्या वाढीसह 756.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 670 टक्के नफा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
अदानी पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.92 लाख कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे 19.58 कोटी रुपये मूल्याचे 2.74 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 14.65 टक्के वाढीसह 866.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अदानी पॉवर स्टॉकचा RSI इंडेक्स 67.1 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ‘ओव्हरबॉट’ किंवा ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. सध्या हा स्टॉक आपल्या 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.
स्टॉकबॉक्स फर्मने अदानी पॉवर स्टॉक 790 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. आज या स्टॉकने सर्व पातळी ओलांडली आहे. तसेच तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 655 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला होता. यावर्षी उन्हाळ्यात भारतामध्ये सरासरी विजेची मागणी 260 GW पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. विजेचा वापर वाढल्याने अदानी पॉवरसारख्या कंपन्यांना जबरदस्त फायदा होत आहे.
मागील पाच वर्षांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 1,315 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 670 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 197 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक आतापर्यंत 44 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 24 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.