3 May 2024 7:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Bank FD Vs Post Office Interest | पोस्ट ऑफिस स्कीम आणि बँक FD पैकी कशात अधिक पैसे मिळतील? नवीन व्याजदर पाहून ठरावा

Bank FD Vs Post Office Interest rate

Bank FD Vs Post Office Interest | RBI ने नुकताच पत धोरण जाहीर केले, आणि त्यात RBI ने रेपो दर पुन्हा एकदा वाढवला आहे. त्यानंतर अनेक बँकांनी एफडी व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. सध्या अनेक बँका एफडीवर 6-7 टक्के व्याज परतावा देतात. तर दुसरीकडे भारत सरकारने पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांवर दिले जाणारे व्याज ही वाढवले आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांवर बँक एफडीच्या तुलनेत जास्त व्याज परतावा मिळतो. चाला तर मग जाणून घेऊ, कोणत्या पोस्ट ऑफिस योजना आणि बँक एफडी अधिक फायदेशीर आहेत?

पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक व्याज परतावा मिळेल. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये PO ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि PO मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणूक मर्यादा वाढवण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास FD पेक्षा जास्त व्याज मिळतो. SBI , HDFC आणि ICICI बँक आणि पोस्ट ऑफिस SCSS, PPF, राष्ट्रीय बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळतो, जाणून घेऊ.

SBI मुदत ठेव योजना :
भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ‘स्टेट बैंक ऑफ इंडिया’ आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्ष कालावधीची एफडी स्कीम सुविधा देते. SBI च्या मुदत ठेव योजनेत 3.50 टक्के ते 7.25 टक्के व्याज दर मिळतो.

HDFC बँक FD व्याज दर :
भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक ‘HDFC’ बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्ष कालावधीची FD योजनां सुविधा देते. बँक एफडीवर 3 टक्के ते 7 टक्के व्याज परतावा देते. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.75 टक्के व्याज परतावा देते.

ICICI बँक FD व्याज दर :
ICICI बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्ष कालावधीची मुदत ठेव योजना सुविधा देते. त्यावर लोकांना 3 टक्के ते 7 टक्के व्याज परतावा दिला जातो. आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.50 टक्के व्याज परतावा दिला जातो.

पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना :
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय योजना मानली जाते. पोस्ट ऑफिस योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे असून त्यात गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो.

पोस्ट ऑफिस SCSS योजना :
भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणुक करण्याची मर्यादा वाढवली आहे. पूर्वी या योजनेत गुंतवणूक करण्याची मर्यादा 15 लाख रुपये होती , ती आता वाढवून 30 लाख रुपये पर्यंत वाढवली आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 असून त्यात गुंतवणूक केल्यास 8 टक्के व्याज परतावा दिला जातो.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
पोस्ट ऑफिसच्या एनएससी योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्ष असून यात गुंतवणूक केल्यास वार्षिक सात टक्के व्याज परतावा मिळतो. या पोस्ट ऑफिस योजनेत व्याज परतावा तिमाही आधारावर दिला जातो.

सुकन्या समृद्धी योजना :
पोस्ट ऑफिसच्या ही योजना सर्वात जास्त परतावा देणाऱ्या योजनेपैकी एक आहे. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्यास लोकांना EEE चा लाभ मिळतो. म्हणजे या योजनेत गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम यावर कर भरावा लागत नाही. सध्या या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्यास 7.6 टक्के व्याज परतावा दिला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank FD Vs Post Office Interest rates for good return check details on 11 February 2023.

हॅशटॅग्स

Bank FD Vs Post Office Interest rate(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x