
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.37 टक्क्यांच्या वाढीसह 622 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. 4 एप्रिल 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 647 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 3.86 टक्क्यांनी खाली आला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 1.16 टक्के घसरणीसह 605.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 3,558 कोटी रुपये PBT नोंदवला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा PBT 898 कोटी रुपये होता. अदानी पॉवर कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 30.5 टक्के वाढीसह 13,364 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
शेअर बाजारातील दिगाज पाच तज्ञापैकी चार जणांनी या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉकमध्ये 580-570 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर शेअरने 625 रुपये किमतीवर प्रतिकार पातळी निर्माण केली आहे. जर हा स्टॉक प्रतिकार पातळीच्या वर गेला तर शेअर 650 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉक पुढील काळात 650 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र गुंतवणुकदारांनी 570 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉकमध्ये 580 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. Tips2trades फर्म च्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉकमध्ये 629 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 580 रुपये या सपोर्ट लेव्हलच्या खाली गेला तर शेअर 502 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉकमध्ये 575 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 625 रुपये किमतीवर प्रतिरोध पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 625 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 650 रुपये किमतीवर जाऊ शकतो. पुढील एका महिन्यासाठी शेअर्सची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 560 ते 660 रुपये असेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.