14 December 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tata Steel Stock Split | टाटा स्टील स्टॉक स्प्लिटचा निर्णय, गुंतवणूकदारांना एका शेअरच्या मोबदल्यात 10 शेअर्स मिळणार

Tata steel stock split

Tata Steel Stock Split | टाटा स्टीलच्या संचालक मंडळाने मे महिन्यात स्टॉक विभाजन करण्याची घोषणा केली होती. शेअर्सचे विभाजन लागू झाल्यानंतर टाटा स्टीलच्या एका शेअरचे दहा शेअर्स मध्ये विभाजन होईल. गेल्या एक वर्षापासून टाटा स्टीलचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकला आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 26.52% पडझड झाली.

ठळक मुद्दे :
1. टाटा स्टीलने मागील तिमाहीचा निकाल जाहीर करताना शेअर विभाजनाची घोषणा केली होती.
2. कंपनी 1:10 च्या प्रमाणात स्टॉक विभाजित करेल.
3. भांडवली बाजारातील तरलता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीत घेता यावा यासाठी शेअर विभाजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

29 जुलै 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित :
टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाटा स्टीलने शेअर्स विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाने 1:10 च्या प्रमाणात स्टॉक विभाजित करण्यासाठी 29 जुलै 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. मागील तिमाही निकाल जाहीर करताना, कंपनीने स्टॉक विभाजित करण्याची घोषणा केली होती. शेअरच्या विभाजनानंतर, टाटा स्टीलचा एक शेअर 10 शेअरर्स मध्ये विभागला जाईल.

भांडवली बाजारात तरलता वाढावी, गुंतवणूकदारांना शेअर परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हावे आणि लहान गुंतवणूकदारांना सहज परतावा मिळवता यावा या उद्देशाने शेअर्सचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या संचालक मंडळाने सांगितले आहे.

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय :
स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअरचे विभाजन करून शेअर्सची संख्या वाढवणे याला स्टॉक स्प्लिट म्हणतात. सहसा, जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खूप महाग होतात आणि किरकोळ गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत, लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि बाजारात आपल्या शेअरची मागणी वाढवण्यासाठी कंपनी स्टॉक विभाजित करतात. शेअर विभाजनामुळे कंपनीच्या शेअर्सची संख्या वाढते. पण याचा कंपनीच्या बाजार भांडवलावर परिणाम होत नाही. स्टॉकचे विभाजन झाले तर अर्थातच त्याचा परिणाम शेअरच्या किंमतवर होते आणि शेअरची किंमत कमी होती. यामुळे लहान गुंतवणूकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतात. सहसा शेअर विभाजन झाल्यानंतर काही काळ ते शेअर वधारलेले असते.

सुरुवातीला शेअर्समध्ये वाढ, नंतर घसरण :
टाटा स्टीलचे शेअर शुक्रवार, 22 जुलै रोजी तेजीत व्यवहार करत होते. पडझडीत ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर, इंट्राडेमध्ये शेअरची किंमत 944 रुपयांपर्यंत पोहोचली होती. तथापि, नंतर बाजार बंद होईपर्यंत टाटा स्टील पुन्हा खाली आला. आणि बाजार बंद होताना शेअर 0.19 % घसरणीसह 936.05 रुपयांवर आला.

गेल्या एका महिन्यात टाटा स्टील शेअर मध्ये 11.19 % वाढ झाली. मात्र, मागील वर्षभरात टाटा स्टीलचे शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना २६.५२ टक्क्यांचा नकारात्मक परतावा दिला. त्याचप्रमाणे टाटा समूहाचा हा दिग्गज स्टॉक मागील सहा महिन्यांत 14.90% नकारात्मक वाढ दाखवत आहे. 2022 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत टाटा स्टील ने आपल्या गुंतवणूकदारांचे 18% चा नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Tittle | Tata steel stock split declared by board of directors on 23 july 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x