10 May 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

Adani Power Share Price | गुंतवणूकदार अदानी पॉवर शेअर्स का विकत आहेत? स्टॉकबाबत तज्ज्ञ काय सांगत आहेत जाणून घ्या

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अदानी पॉवर स्टॉक YTD आधारे 16.69 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील वर्षी 22 ऑगस्ट 2022 रोजी अदानी पॉवर स्टॉक 432.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या वार्षिक उच्चांक पातळीवरून शेअरची किंमत 42.61 टक्क्यांनी घसरली आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 0.62 टक्क्यांच्या घसरणीसह 248.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 245.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

2023 या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिका स्थित शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या विरोधात एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालात करण्यात आलेले आरोप अदानी समूहाने फेटाळले होते. तथापि अदानी पॉवर आणि अदानी समुहाच्या शेअर्समध्ये GQG ही अमेरिकन कंपनी मोठ्या प्रमाणत गुंतवणूक करत आहे. अदानी पॉवर स्टॉकने 28 फेब्रुवारी 2023 रोजी 132.55 रुपये ही 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आतापर्यंत स्टॉकमध्ये 87.40 टक्के सुधारणा झाली आहे.

अदानी पॉवर स्टॉकमध्ये तांत्रिक चार्टवर 231 रुपये किंमत पातळीजवळ मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते पुढील काळात अदानी पॉवर स्टॉक 270 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र स्टॉक 258 रुपये या प्रतिरोधक पातळीच्या क्लोज झाले पाहिजे. ज्या गुंतवणूकदारांनी अदानी पॉवर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना तज्ञांनी 230 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

अदानी पॉवर कंपनीने झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात थर्मल पॉवर प्लांटचे काम सुरू केले आहे. त्यामुळे स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली होती. म्हणून पुढील काळात हा स्टॉक 270 रुपये किंमत स्पर्श करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price today on 05 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या