
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 340 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांनी मजबूत झाले होते. अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी अदानी पॉवर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
अदानी पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2029 पर्यंत 21,110 मेगावॅट थर्मल पॉवर उत्पादन क्षमता स्पर्श करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के घसरणीसह 343.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच अदानी पॉवर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारां समोर आपल्या कामगिरी आणि योजनांचे प्रेझेंटेशन सादर केले होते. या सादरीकरणात अदानी पॉवर कंपनीची सध्याची वीज निर्मिती क्षमता आणि प्रकल्पांबद्दल सविस्तर माहिती यांचे डिटेल देण्यात आले होते. अदानी पॉवर कंपनीची सध्याची वीज निर्मिती क्षमता 15,210 मेगावॅट असून कंपनीने नुकताच एक 1600 मेगावॅट क्षमतेचे ब्राउनफील्ड प्रकल्प उभारले आहे.
याशिवाय अदानी पॉवर कंपनीचे 3200 मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहेत. अदानी पॉवर कंपनीने पुढील काळात 1,100 मेगावॅट क्षमतेचे अकार्बनिक थर्मल पॉवर उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे.
मागील आठवड्यात GQG या अमेरिकन गुंतवणूक कंपनीने अदानी पॉवर कंपनीमध्ये 1.1 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीसह GQG ने अदानी पॉवर कंपनीचे 8.1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. GQG कंपनीने अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 279.17 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी करून गुंतवणूक केली आहे. अशाप्रकारे अदानी पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांना GQG कंपनीकडून गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.1 बिलियन डॉलर्स म्हणजेच 9,000 कोटी रुपये मिळाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.