
Adani Power Share Price | मागील काही दिवसापासून अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. काल मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 261.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे.
आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 1.79 टक्के घसरणीसह 255.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या तुलनेत आज अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये अल्प विक्री पाहायला मिळत आहे.
अदानी समूहाचा भाग असलेल्या अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. यात NDTV, अंबुजा सिमेंट आणि अकचे दिग्गज कंपन्या देखील सामील झाले आहेत. अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 875.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 26 रुपयेवरून वाढून 261 रुपयेवर पोहचली आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील 10 टक्क्यांच्या वाढीसह 1,089.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 662.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स देखील 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
अदानी समुहाच्या अनेक कंपन्याच्या शेअरमध्ये एका दिवसात एवढी प्रचंड तेजी येण्याचे कारण म्हणजे, अमेरिकेतील गुंतवणूक फर्म बेन कॅपिटलने अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी कॅपिटल अँड अदानी हाऊसिंगमधील 90 टक्के भाग भांडवल खरेदी केल्याची बातमी आली आहे. या करारांतर्गत बेन कॅपिटल फर्मने गौतम अदानी यांच्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीमधील 90 टक्के भाग भांडवल ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित 10 टक्के भाग भांडवल कंपनी व्यवस्थापन, MD आणि CEO गौरव गुप्ता यांनी धारण केले आहे. बेन कॅपिटल कंपनीने अदानी समूहातील NBFC कंपनीचे भाग भांडवल खरेदी केल्यानंतर अदानी ग्रुपमधील कंपन्यामध्ये 120 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूकीचे आगमन होणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.