28 March 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Nykaa Share Price | नायका शेअर 61% स्वस्त झाला, पडझड होण्याचे कारण काय? स्वस्त स्टॉकवर तज्ञांकडून महत्वाची अपडेट

Nykaa Share price

Nykaa Share Price | FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स ही नायका ब्रँडची मुख्य कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. या कंपनीचे शेअर्स काल मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरले होते, तर आज बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.64 टक्के घसरणीसह 128.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. बीएसई इंडेक्सवर शेअर 3.64 टक्क्यांनी कमजोर झाला असून, शेअरची किंमत 128 रुपयांपर्यंत खाली आली आहे. नायका कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत असून सलग चौथ्या दिवशी शेअर लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. नायका शेअरची किंमत मागील एका वर्षात 61 टक्के पेक्षा अधिक कमजोर झाली आहे. या कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)

स्टॉक बाजारात तज्ञांचे मत :
स्थित वित्तीय सेवा प्रवठा करणारी कंपनी HSBC ने नायका कंपनीच्या शेअर वर नवीन लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मने नायका स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 जानेवारी 2022 पासून आतापर्यंत शेअरची किंमत 14 टक्के पडली आहे. 11 जानेवारी रोजी स्टॉक ग्रीन निशाणमध्ये ट्रेड करत होता. HSBC फर्मने आपल्या इंडिया इक्विटी स्टॅटेजिक रिपोर्टमध्ये म्हंटले आहे की, 16 जानेवारी रोजी आपल्या इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजिक रिपोर्टमधे म्हंटले आहे की, “वाढत्या उत्पन्नामुळे आणि अलीकडील लॉक-इन एक्सपायरीमुळे आणि परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे नायका स्टॉक कमजोर झाला आहे.

“HSBC फर्मला विश्वास आहे की, पुढील काळात नायका कंपनीच्या शेअर्सचे मूल्यांकन अधिक आकर्षक होऊ शकते. कंपनीचे शेअर्स ओव्हर सोल्ड झाले आहेत, त्यामुळे शेअर्स पुढील काळात वाढतील, अशी शक्यता आहे. नायका कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4.35 टक्के पडले होते, ते बुधवारी 3.64 टक्के खाली आले. सध्या शेअरची किंमत 128.45 रुपये किमतीवर आली आहे. काल सुरुवातीच्या काही तासात या स्टॉकने 132.55 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 38,252 कोटी रुपये आहे.

नायका शेअर किंमतीवर तज्ञांचे मत :
HSBC फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “आम्ही नायका च्या व्यावसायिक विभागांचे ‘Sum of The Parts’ या दृष्टीने मूल्यांकन करत आहोत. आम्ही DCF पद्धतीचा वापर करून सौंदर्य, पर्सनल केअर, आणि फॅशन बिझिनेसचा दृष्टीकोन निश्चित करतो. eB2B सेगमेंट आणि नायका सुपरस्टोरद्वारे कंपनी पुढील काळात 6.0 टक्के टर्मिनल वाढ प्राप्त करू शकते. म्हणून आम्ही नायका शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहोत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price 543384 in focus check details on 18 January 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x