
Adani Total Gas Share Price | जानेवारी महिन्यात हिंडनबर्ग फर्मने अदानी समुहावर एक अहवाल जाहीर केला, आणि त्यामुळे अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स अजूनही या धक्क्यातून सावरले नाही. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग अहवाल जाहीर झाल्यापासून आतपर्यंत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 80 टक्के कमजोर झाले आहेत. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 699.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Adani Total Gas Share Price Today)
शेअर्सची घसरंगुंडी :
हिंडनबर्ग फर्मचा अहवाल आल्यानंतर ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 83,73 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. हिंडेनवर्ग फर्मने 24 जानेवारी 2023 रोजी (Adani Total Gas Share Price NSE) अदानी समूहावर अहवाल जाहीर केला होता. त्या दिवशी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3891.75 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. शुक्रवार 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 699.10 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 633.35 रुपये होती. अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत (Adani Total Gas Share Price BSE) पातळी 4000 रुपये होती.
अदानी टोटल गॅस स्टॉक खरेदी करावा? :
ग्लोबल इंडेक्स फर्मने त्यांच्या तिमाही व्यापक निर्देशांक पुनरावलोकनात अदानी टोटल गॅस कंपनीला MSCI मधून बह काढण्याचा निर्णय घेतला आहे. MSCI इंडिया इंडेक्समधून अदानी टोटल गॅस कंपनीला वगळण्यात आल्याने 186 दशलक्ष डॉलर्सचा निर्गमन होण्याची शक्यता आहे. MSCI च्या आदेशाची अंमलबजावणी 31 मे 2023 रोजी पासून लागू होणार आहे.
एमएससीआय निर्देशांकातील बदलामुळे अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, नुकताच सुरू केलेला निधी उभारणी कार्यक्रम फारशी कमाल करु शकला नाही. मागील एका महिन्यात अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 32 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. 19 एप्रिल 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 930.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 633.35 रुपयेपर्यंत खाली आला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.