3 May 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Rekha Jhunjhunwala | रेखा झुनझुनवाला यांनी डीबी रियल्टी स्टॉकमध्ये गुंतवणूक वाढवली, पोर्टफोलओमधील स्टॉक परफॉर्मन्स जाणून घ्या

Rekha Jhunjhunwala

Rekha Jhunjhunwala | दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी डीबी रियल्टी कंपनीचे शेअर्स खरेदी करून आपली गुंतवणूक वाढवली आहे. नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांनी DB रियल्टी कंपनीचे 1 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 1.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. जून 2023 तिमाहीच्या शेवटी रेखा झुनझुनवाला यांनी DB रियल्टी कंपनीचे 1.42 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

रेखा झुनझुनवाला यांनी फोर्टिस हेल्थकेअर कंपनीच्या शेअरमध्ये देखील आपली गुंतवणुक वाढवली आहे. मात्र त्यांनी फेडरल बँकेतील आपला हिस्सा काही प्रमाणात कमी केला आहे. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी डीबी रियल्टी कंपनीचे शेअर्स 6.49 टक्के वाढीसह 158.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार रेखा झुनझुनवाला यांनी जुलै 2023 मध्ये कंपनीचे 1.21 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर 13 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचे भाग भांडवल प्रमाण 3.37 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. रेखा झुनझुनवाला यांनी जून 2023 च्या तिमाहीत कंपनीतील त्यांचा हिस्सा 0.57 टक्के वाढवला आहे.

मागील 6 महिन्यांत डीबी रियल्टी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 750 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. सध्या रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डीबी रियल्टी कंपनीचे 3.51 कोटी शेअर्स आहेत.

रेखा झुनझुनवाला यांनी फोर्टिस हेल्थकेअरमध्ये देखील स्टॉक खरेदी करून आपली गुंतवणूक वाढवली आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत त्यांनी फोर्टिस हेल्थकेअरमधील आपला हिस्सा 4.66 टक्केवर नेला आहे. रेखा झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेतील आपली हिस्सेदारी 0.20 टक्केने कमी केली आहे. सध्या रेखा झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेचे 2.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

रेखा झुनझुनवाला यांनी जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत ऑटोलाइन इंडस्ट्रीज आणि रैलिस इंडिया कंपनीमधील आपले शेअर विकून हिस्सेदारी कमी केली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये मेट्रो ब्रँड्स, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, टायटन कंपनी, कॅनरा बँक, इंडियन हॉटेल कंपनी, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा मोटर्स यासारखे शेअर्स सामील आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rekha Jhunjhunwala Portfolio NSE 27 October 2023.

हॅशटॅग्स

Rekha Jhunjhunwala Portfolio(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x