
Adani Transmission Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 4.35 टक्क्यांच्या वाढीसह 828.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग सेशनदरम्यान या कंपनीच्या स्टॉकने इंट्राडे मध्ये 834.10 रुपये ही उच्चांक पातळी आणि 796.50 रुपये ही नीचांक पातळी स्पर्श केली होती.
मागील सहा महिन्यांत शेअर 70 टक्के कमजोर
मागील सहा महिन्यांत अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 70 टक्के कमजोर झाले आहेत. जानेवारी 2023 मध्ये हा शेअर 2800 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 817.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अदानी ट्रान्समिशन स्टॉक वाढीचे कारण
भारतीय बिझनेस मीडिया रिपोर्ट्सनुसार अदानी ट्रान्समिशन कंपनीमधील ब्लॉक डीलसंबंधित बातमीमुळे स्टॉक अचानक तेजीत आला होता. या अहवालानुसार अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या 15.34 लाख शेअर्सची ब्लॉक डील झाली आहे. याचे एकूण मूल्य 128.3 कोटी रुपये होते. हे प्रमाण अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या एकूण शेअर्सच्या 0.16 टक्के आहे. नुकताच अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी टोटल गॅस या दोन्ही कंपन्याच्या शेअर्सला एमएससीआय ग्लोबल स्टैंडर्ड इंडेक्समधून बाहेर काढण्यात आले आहे.
तिमाही निकाल
अदानी ट्रान्समिशन कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत 389.45 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 229.59 कोटी रुपयेवरून 69.62 टक्के वाढला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात अदानी ट्रान्समिशन कंपनीचा एकूण नफा 28 टक्के वाढीसह 977 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
चौथ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA वाढून 1,706 कोटी रुपयेवर पोहचला आहे. आणि त्यात वार्षिक 23 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तथापि अदानी ट्रान्समिशन कंपनीने Q4 FY2023 मध्ये 3,200.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. Q4 FY2022 मध्ये अदानी ट्रान्समिशनचा एकूण महसूल 3,048.96 कोटी होता. जो या तिमाहीत 4.97 टक्के वाढला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.