
Adani Wilmar Share Price | हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी ग्रुपचा हाग असलेल्या अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 28 फेब्रुवारी 2023 रोजी 327 रुपये किमतीपर्यंत घसरले होते. त्यानंतर हा अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 320.25 रुपये आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. 8 फेब्रुवारी 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीच्या शेअरने 221 रुपये ही आपली सर्वकालीन नीचांक किंमत स्पर्श केली होती.
जर आपण अदानी विल्मर कंपनीच्या सध्याच्या किमतीची तुलना 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीसोबत केली तर, समजेल की हा स्टॉक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत निम्म्या किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 730 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी अदानी विल्मर स्टॉक 2.14 टक्के घसरणीसह 313.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी विस्मर शेअरचा इतिहास
मागील एका वर्षात अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 678.40 रुपये किमतीवरून घसरून 325 रुपये किमतीवर आले होते. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 52 टक्के घसरले आहेत. मागील सहा महिन्यांत अदानी विल्मर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 18.69 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. अदानी विल्मार कंपनीबाबत सकारात्मक गोष्ट म्हणजे, कंपनीवर खूप कमी कर्ज आहे. आणि या कंपनीमध्ये निव्वळ रोख प्रवाह निर्माण करण्याची क्षमता देखील प्रचंड आहे.
अदानी विल्मार कंपनीची कमजोरी
अदानी विल्मर कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून सर्वाधिक घसरण झालेल्या स्टॉकच्या यादीत सामील झाले आहेत. अदानी विल्मार स्टॉकने आता MACD सिग्नल लाइन ओलांडली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर कंपनीच्या शेअरने 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी केली होती.
मध्यम ते कमी ट्रेंडलाइन मोमेंटम स्कोअर असलेल्या अदानी विल्मर स्टॉकचे ROCE, ROE आणि ROA मागील दोन वर्षांपासून घसरताना दिसत आहे. घसरत्या नफ्याच्या मार्जिनसह कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट पाहायला मिळाली आहे. मागील दोन तिमाहीपासून कंपनीच्या महसूल आणि नफ्यात देखील घट पाहायला मिळाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.