
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने मार्च 2024 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या कंपनीने 2023-24 आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत 156.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 93.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( अदानी विल्मर लिमिटेड कंपनी अंश )
मार्च 2024 तिमाहीत अदानी विल्मर कंपनीने 13,342.26 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. 2022-23 मध्ये याच तिमाहीत कंपनीने 14,185.68 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी अदानी विल्मर स्टॉक 0.65 टक्के घसरणीसह 349.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अदानी विल्मर कंपनीने 147.99 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने 582.12 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 51,555.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यापूर्वी म्हणजेच 2022-23 मध्ये या कंपनीने 59,148.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
अदानी विल्मर कंपनीचे एमडी आणि सीईओ अंगशु मलिक यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, अदानी “विल्मर कंपनीच्या किरकोळ व्यवसायाची व्याप्ती वाढल्यामुळे कंपनीच्या खाद्यतेल आणि खाद्यपदार्थ व्यवसायात मजबूत वाढ नोंदवली गेली आहे”. अदानी विल्मर ही कंपनी अदानी समूह आणि सिंगापूरच्या विल्मर ग्रुपचा संयुक्त उपक्रम आहे.
अदानी विल्मर ही कंपनी फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेल आणि दैनंदिन वापरातील घरगुती उत्पादने विकण्याचा व्यवसाय करते. मार्च 2024 तिमाही निकालापूर्वी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी अदानी विल्मर स्टॉकमध्ये जोरदार खरेदी केली होती. सध्या मार्च तिमाहीची कामगिरी पाहून ब्रोकरेज फर्म नुवामाने अदानी विल्मर स्टॉकवर 480 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.