
Adani Wilmar Share Price | ‘हिंडेनबर्ग’ ने अदानी समूहावर जाहीर केलेल्याअहवालानंतर मार्च 2023 मध्ये भारतातील 5 दुग्गज म्युच्युअल फंडांनी अदानी समूहाच्या 2 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. ‘अदानी पॉवर’ आणि ‘अदानी विल्मार लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये म्युचुअल फंडाने मोठी गुंतवणूक केली आहे. ‘मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड’, ‘मिरे म्युच्युअल फंड’ आणि ‘एडलवाईस म्युच्युअल फंड’ यांनी ‘अदानी पॉवर’ कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. तर ‘UTI म्युच्युअल फंड’ आणि ‘HSBC म्युच्युअल फंड’ यांनी ‘अदानी विल्मार’ कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहेत. (Adani Wilmar Limited)
‘मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंड’ ने अदानी पॉवर कंपनीचे 414000 शेअर्स खरेदी केले असून त्याचे एकूण मूल्य आठ कोटी रुपये आहे. ‘मिरे म्युच्युअल फंड’ ने अदानी पॉवर कंपनीचे 74000 शेअर्स 1 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. त्याच वेळी, ‘एडलवाइज म्युच्युअल फंड’ ने अदानी पॉवर कंपनीचे 5000 शेअर्स खरेदी केले आहेत.
हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी 2023 रोजी जाहीर झाला तेव्हा अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 274.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 1 मार्च 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 153.60 रुपये पर्यंत घसरले होते. तर 13 एप्रिल 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 188.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
‘UTI म्युच्युअल फंड’ ने ‘अदानी विल्मर’ कंपनीचे 1.8 लाख शेअर्स 7 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. यूटीआय म्युच्युअल फंडाने हे शेअर्स 389 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले होते. त्याच वेळी ‘HSBC म्युच्युअल फंड’ ने ‘अदानी विल्मार’ कंपनीचे 3000 शेअर्स खरेदी केले.24 जानेवारी 2023 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 572.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 379.70 रुपयांवर पोहचले होते. 13 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 410.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
म्युच्युअल फंडांची इतर गुंतवणूक :
2023 या वर्षात मार्च 2023 मध्ये म्युच्युअल फंडांनी इन्फोसिस कंपनीमध्ये 2500 कोटी रुपये, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये 1900 कोटी रुपये, HDFC बँकमध्ये 1400 कोटी रुपये, गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी म्युच्युअल फंडांनी मार्च 2023 मध्ये अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 6400 कोटी रुपये, एसआरएफ कंपनीमध्ये 5400 कोटी रुपये, आणि मॅक्स हेल्थमध्ये 4400 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.