 
						Aditya Birla Capital Share Price | आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीने आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी आदित्य बिर्ला फायनान्सचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान शेअर्सची किंमत 179.65 रुपये किमतीवर आली होती. ( आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनी अंश )
मागील वर्षी 3 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 199.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 199.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 139.35 रुपये होती. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी आदित्य बिर्ला कॅपिटल स्टॉक 7.00 टक्के घसरणीसह 170.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच ब्रोकरेज जेएम फायनान्शियल फर्मने आपल्या अहवालात आदित्य बिर्ला कॅपिटल स्टॉकचे विश्लेषण केले आहे. या अहवालात तज्ञांनी आदित्य बिर्ला कॅपिटल स्टॉकवर 240 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपली पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.
खरेतर या विलीनीकरणाचे मुख्य कारण म्हणजे, आदित्य बिर्ला कॅपिटल ही एक सूचीबद्ध नॉन-डिपॉझिट गुंतवणूक कंपनी आहे. तर आदित्य बिर्ला फायनान्स ही एक नॉन-बँकिंग फायनान्स नियमानुसार नोंदणीकृत असलेली सूचीबद्ध नॉन-डिपॉझिट गुंतवणूक कंपनी आहे. या विलीनीकरणानंतर, आदित्य बिर्ला कॅपिटल होल्डिंग कंपनी NBFC मध्ये रुपांतरीत होईल. यामुळे आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीची आर्थिक ताकद आणि सामर्थ्य वाढणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		