15 December 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Zomato Share Price | स्वस्त झालेला झोमॅटो शेअर अल्पावधीत मालामाल करणार, मिळेल 30% परतावा

Zomato Share Price

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 156.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजार तज्ञांच्या मते, पुढील काळात झोमॅटो कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( झोमॅटो कंपनी अंश )

मागील 6 महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 175.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49 रुपये होती. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के घसरणीसह 150.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचएसबीसी फर्मने झोमॅटो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीच्या तज्ञांच्या मते, झोमॅटो कंपनीचे शेअर्स पुढील काळात 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. यापूर्वी तज्ञांनी झोमॅटो शेअर्सवर 163 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. तज्ञांच्या मते, झोमॅटो स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढू शकतो.

मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 13 मार्च 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 51.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 156.80 रुपये किमतीवर पोहोचले होते. 2024 या वर्षात झोमॅटो स्टॉकची किंमत 26 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

1 जानेवारी 2024 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 124.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 मार्च 2024 रोजी 156.80 रुपये किमतीवर पोहचले होते. झोमॅटो कंपनीचा IPO जुलै 2021 मध्ये 76 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. 23 जुलै 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE Live 13 March 2024.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x