 
						Aditya Vision Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधत असाल तर तुम्ही आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. बिहारस्थित आदित्य व्हिजन कंपनीने मागील सात वर्षात आपल्या शेअर धारकांना करोडपती बनवले आहे. या कालावधीत आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना 12,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,845.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,220 कोटी रुपये आहे.
आदित्य व्हिजन ही कंपनी बिहार तसेच झारखंड राज्यात ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा विक्री व्यवसाय करते. 16 डिसेंबर 2016 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.30 रुपयेवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 11,958.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 1,898.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जर तुम्ही 7 वर्षापूर्वी आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11,958.82 टक्के वाढून 1.20 कोटी रुपये झाले असते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 26.97 टक्के वाढली आहे.
मागील एका वर्षात आदित्य व्हिजन कंपनीच्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 144.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांनी देखील आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मार्च 2023 तिमाहीपर्यंत त्यांनी एकूण 1.1 टक्के भाग भांडवल धारण केले होते. सध्याच्या बाजार भावानुसार त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 24.8 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		