Advik Capital Share Price | शेअरची किंमत 2 रुपये, 2 वर्षात 1350% परतावा देणाऱ्या अद्विक कॅपिटल शेअर्सची खरेदी वाढली
Advik Capital Share Price | अद्विक कॅपिटल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.56 टक्क्यांच्या घसरणीसह 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अद्विक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 99 कोटी रुपये होते. अद्विक कॅपिटल कंपनीने दीर्घकालीन व्यवसाय धोरण आणि विविध क्षेत्रात विस्तारित ऑपरेशन्ससाठी नवीन व्यवसाय योजना तयार केल्या आहेत.
अद्विक कॅपिटल कंपनीच्या मॅनेजमेंटने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी आणि आधुनिक व्यवसायांमध्ये विविधता आणण्यासाठी मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी अद्विक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 2.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एकूण 110 कोटी रुपयेचे नेटवर्क आणि 200 कोटी रुपयेची एकूण मालमत्ता असणाऱ्या अद्विक कॅपिटल कंपनीने 2025 पर्यंत NBFC बनण्याचे लक्ष निर्धारित केले आहेत. ही कंपनी वित्तीय बाजारपेठेत आपल्या ग्राहकांना अनेक संरचित उत्पादने ऑफर करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 500 कोटी रुपये मालमत्ता असलेल्या कंपनीला एनबीएफसी मानते.
अद्विक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.16 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.90 रुपये होती. मागील एका महिन्यात अद्विक कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये 14 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे.
29 ऑक्टोबर 2020 रोजी अद्विक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 28 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 12 पट वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. अद्विक कॅपिटल लिमिटेड कंपनीने निधी उभारण्याची नवीन योजना आखली आहे.
नुकताच अद्विक कॅपिटल कंपनीने SEBI कडे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड श्रेणी-II च्या परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता. पर्यायी गुंतवणूक निधीतून कंपनीने 250 कोटी रुपये निधी जमा करण्याची योजना आखली आहे. या रक्कमेचा वापर कंपनी आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी खर्च करेल.
मागील 2 वर्षात अद्विक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 29 पैशांवरून वाढून 5 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1350 टक्के नफा कमावून दिला आहे. अद्विक कॅपिटल ही एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असून आपल्या ग्राहकांना आवश्यक भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Advik Capital Share Price BSE 15 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट