
AGI Greenpac Share Price Today | ‘एजीआय ग्रीनपॅक’ या पॅकेजिंग उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 550 रुपयांवर पोहचले आहेत. एजीआय ग्रीनपॅक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना सुरूवातीपासून आतपर्यंत 26000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
दिग्गज गुंतवणूकदार आशिष धवन यांनी देखील कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी मुख्यतः काचेचे कंटेनर, विशेष काच, पॉलिथिलीन टेरेफ्थालेट, बाटल्या आणि उत्पादने, सुरक्षा टोपी बनवण्याचे काम करते. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.17 टक्के वाढीसह 551.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
13 जून 2003 रोजी एजीआय ग्रीनपॅक कंपनीचे शेअर्स 2.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या काळात शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.66 कोटी रुपये झाले आहे. 8 मे 2023 रोजी हा स्टॉक 535.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. एजीआय ग्रीनपॅक कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 26545 टक्के.नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही जून 2003 मध्ये या कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.66 कोटी रुपये झाले असते.
1550 टक्के परतावा :
एजीआय ग्रीनपॅक कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. 17 मे 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 32.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 मे 2023 रोजी हा स्टॉक 535.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदाराना 1550 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी एजीआय ग्रीनपॅक कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16.50 लाख रुपये झाले असते.
दिग्गज गुंतवणुकदार आशिष धवन यांनी एजीआय ग्रीनपॅक कंपनीचे 3100000 शेअर्स होल्ड केले आहेत. आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार आशिष धवन यांनी एजीआय ग्रीनपॅक कंपनीचे 4.79 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. आणि सुनील सिंघानिया यांच्या आबॅकस इमर्जिंग अपॉर्म्युनिटीज फंड ने या कंपनीचे 12,06,364 शेअर्स म्हणजेच 1.86 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.