 
						Ajanta Pharma Share Price | अजंता फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये जून 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी गुंतवणूकदारांनी अजंता फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. शुक्रवारी अजंता फार्मा कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. इतक्या अफाट तेजीसह अजंता फार्मा कंपनीचे शेअर्स 1735.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Ajanta Share Price)
या कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. जून 2023 तिमाहीत अजंता फार्मा कंपनीने 208 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.06 टक्के वाढीसह 1,600.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
जून तिमाहीची कामगिरी :
जून 2023 तिमाहीत अजंता फार्मा कंपनीने 1021 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत कंपनीने 271 कोटी रुपये EBITDA नोंदवला आहे. मागील वर्षी याच जून तिमाहीत कंपनीचा PAT 175 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर यावेळी कंपनीने 208 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने जून तिमाही निकाल पाहून अजंता फार्मा शेअरवर ‘बाय’ रेटिंग शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरवर 1800 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
ICICI सिक्युरिटीज फर्मने अजिंता फार्मा स्टॉकवर 1950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना 32.84 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25.14 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांना 32.48 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात शेअरची किंमत 8.17 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		