14 December 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Penny Stocks | या शेअरने आधी 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 2.05 कोटी रुपये परतावा दिला, आता 1000 टक्के डिव्हीडंड, हा स्टॉक माहिती आहे?

Multibagger Stocks

Penny Stocks | वाहन उद्योगात लोकप्रिय असलेली मिड-कॅप कंपनी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ही शेअर बाजारात सूचीबद्ध असलेली एक माध्यम आकाराचे बाजार भांडवल असलेली कंपनी आहे. ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे.

प्रत्येक शेअरवर 100 रुपये लाभांश :
वाहन उद्योगात कार्यरत असलेली मध्यम भांडवल कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश रूपाने भेट देणार आहे. महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड कंपनीची मागील काळातील कामगिरी चांगली राहिली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना कमावलेल्या नफ्यातील काही भाग लाभांश म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी कोणतेही कर्ज नाही. कंपनीने SEBI नियामक फाइलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, 31 मार्च 2013 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवर 1000 टक्के अंतरिम लाभांश वितरीत केला जाईल. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 रुपये लाभांश मिळणार आहे. 10 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांच्या खात्यात अंतरिम लाभांश जमा करेल.

गुंतवणुकीचे मूल्य 2.05 कोटी रुपये झाले :
महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडचे शेअर्स सुरुवातीच्या काळात फक्त 25 रुपये किमतीची ट्रेड करत होते. सध्या एका शेअरची किंमत 5000 रुपये पर्यंत गेली आहे. महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडच्या शेअर्सने मागील काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. 6 नोव्हेंबर 2001 रोजी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 25 रुपयांच्या किमत पातळीवर ट्रेड करत होते. 16 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र स्कूटर्सचे शेअर्स BSE निर्देशांकावर 5140 रुपयांच्या किमतीवर जाऊन पोहोचले. 6 नोव्हेंबर 2001 रोजी जर आपण या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, आणि त्याची आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.05 कोटी रुपये झाले असते.

1 लाख गुंतवणुकीवर 15 लाखांचा परतावा : महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडच्या शेअरनी एक लाख गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना 15 लाखांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअर्सनी मागील 10 वर्षांत उत्तम कामगिरी करून व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. 14 सप्टेंबर 2012 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 337.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडचे ​​शेअर्स BSE वर 5140 रुपयेच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. जर 10 वर्षांपूर्वी तुम्ही ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15.24 लाख रुपये झाले असते. महाराष्ट्र स्कूटर्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5309.05 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 3319.15 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Maharashtra Scooter limited share price return on 17 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x