
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहे. मुकेश अंबानी यांची गुंतवणूक असलेल्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 63.97 टक्के परतावा कमावून दिला आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 9.91 टक्के वाढीसह 35.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 4.51 टक्के वाढीसह 37.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 3300 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली होती. रिलायन्स कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीत नॉन-कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने सध्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
आलोक इंडस्ट्रीज कंपनीला रिलायन्स आणि जेएम फायनान्शियल एआरसीने 2019 मध्ये कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत खरेदी करून ताब्यात घेतले होते. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीनंतर, रिलायन्स कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 40.01 टक्के आणि जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
मागील 5 दिवसांत आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 35.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जर तुम्ही 7 दिवसांपूर्वी आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,64,000 रुपये झाले असते. म्हणजेच अवघ्या 8 दिवसात तुम्हाला 64,000 रुपये नफा मिळाला असता. मागील सहा महिन्यात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 119.14 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 52.36 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.