13 December 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Mangalore Refinery Share Price | शेअरची किंमत 159 रुपये! अल्पावधीत दिला 173% परतावा, मागील 2 दिवसात 20% परतावा

Mangalore Refinery Share Price

Mangalore Refinery Share Price | एमआरपीएल या रिफायनरी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून वाढत आहेत. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली झाल्याने शेअर्सची किंमत कमी झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआरपीएल कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 160.95 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षात एमआरपीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 173.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28,208.08 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी एमआरपीएल स्टॉक 0.75 टक्के घसरणीसह 159.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

एमआरपीएल ही कंपनी भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. या कंपनीच्या सेबी फाइलिंगनुसार, एमआरपीएल कंपनीला एव्हिएशन टर्बाइन इंधनचे उत्पादन आणि वितरण यासाठी जारी केले जाणारे AS9100D 2016 प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. हा दर्जा मिळवणारी एमआरपीएल कंपनी पहिली भारतीय रिफायनरी ठरली आहे. 2023 या वर्षात एमआरपीएल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 137.52 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 86 टक्के वाढली आहे.

मागील एका महिन्यात एमआरपीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमवून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एमआरपीएल स्टॉकमध्ये 145-140 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदार हा स्टॉक दीर्घ मुदतीसाठी खरेदी करू शकतात. या स्टॉकमध्ये 170 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळू शकतो. आणि हा टप्पा ओलांडल्यावर शेअर्सची किंमत 188 रुपयेवर जाऊ शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mangalore Refinery Share Price NSE Live 12 January 2024.

हॅशटॅग्स

Mangalore Refinery Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x