
Alpex Solar IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच अल्पेक्स सोलर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. अल्पेक्स सोलर ही कंपनी मुख्यतः सोलर पॅनल बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा IPO 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीने आपल्या IPO साठी शेअर्सची अप्पर प्राईस बँड 115 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचे शेअर्स NSE Emerge निर्देशांकावर सूचीबद्ध केले जाणार आहे.
भारत सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात सोलर पॅनेलबाबतही मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रधानमंत्री सूर्योदय योजने अंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सोलर संयंत्र बसवण्यात येणार आहे. आणि या कुटुंबांना मासिक 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. याचा अर्थ पुढील काळात सोलर पॅनल उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होईल.
अल्पेक्स सोलर कंपनी आपल्या IPO मध्ये 6480000 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. कंपनीने आपल्या IPO साठी कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स कंपनीला बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. आणि स्काईलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
या IPO मधून जमा होणाऱ्या पैशातून 12.94 कोटी रुपये ॲल्युमिनियम फ्रेमच्या सौर मॉड्यूलचे उत्पादन करणारे नवीन उत्पादन युनिट उभारण्यासाठी खर्च केले जाणार आहे. आणि सामान्य कॉर्पोरेट खर्च आणि खेळत्या भांडवलासाठी 20.49 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 111 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 226 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 97 टक्के नफा मिळू शकतो. या कंपनीचे शेअर्स 15 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.