
Ambuja Cement Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.9 टक्क्यांच्या वाढीसह 615.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( अंबुजा सिमेंट कंपनी अंश )
नुकताच अंबुजा सिमेंट कंपनीने 413.75 कोटी रुपये मूल्यावर तमिळनाडूमधील तूतीकोरीनस्थित माय होम ग्रुप कंपनीचे सिमेंट ग्राइंडिंग युनिट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 610.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अंबुजा सिमेंट्स कंपनीने सोमवारी आपल्या निवेदनात माहिती दिली की, अंबुजा सिमेंट कंपनी माय होम ग्रुप कंपनीचे सिमेंट ग्राइंडिंग युनिट खरेदी करणार आहे. या युनिटची क्षमता 1.5 एमटीपीए आहे. यासाठी अंबुजा सिमेंट कंपनीने 413.75 कोटी रुपये मूल्याची ऑफर दिली आहे.
या अधिग्रहणामुळे अंबुजा सिमेंट कंपनीला तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिणेकडील बाजारपेठांमध्ये व्यवसाय विस्तार करण्यास मदत होणार आहे. नवीन अधिग्राहणामुळे अंबुजा सिमेंट कंपनीला पायाभूत सुविधा आणि भौगोलिक फायद्यांव्यतिरिक्त विद्यमान डीलर नेटवर्क देखील मिळणार आहे. अंबुजा सिमेंट कंपनी विद्यमान कर्मचारी वर्ग देखील कायम ठेवणार आहे.
मागील एका महिन्यात अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे अंबुजा सिमेंट स्टॉक 17 टक्के मजबूत झाला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 640.95 रुपये होती. तर नीचांक किंमत 373.30 रुपये होती. अंबुजा सिमेंट कंपनीचे बाजार भांडवल 1,20,915.87 कोटी रुपये आहे. नुकताच ICICI सिक्युरिटीज फर्मने अंबुजा सिमेंट्स स्टॉकची टारगेट प्राइस 831 रुपये निश्चित केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.