15 December 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

Yes Bank Share Price Today | येस बँक शेअर लवकरच 21 रुपयांची प्राईस टार्गेट गाठणार? तिमाही निकालानंतर तेजीचा तज्ज्ञांचा अंदाज

Yes bank Share price

Yes Bank Share Price Today | ‘येस बँक’ च्या बँकेच्या तिमाही आर्थिक निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गुंतवणुकदार बँकेच्या निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत. येस बँक या आठवड्यात आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार 22 एप्रिल 2023 रोजी येस बँक आपले तिमाहीचे निकाल जाहीर करेल. मागील 5 दिवसात येस बँक शेअरची किंमत 7 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.21 टक्के घसरणीसह 16.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Yes Bank Limited)

त्रैमासिक निकालांकडून अपेक्षा :
येस बँकेचे शेअर्स फॉलो करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, येस बँक कंपनीच्या PAT मध्ये मोठी उसळी पाहायला मिळू शकते. त्याच वेळी येस बँक कंपनीच्या प्री-प्रोव्हिजनिंग ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये फारसे चांगले परिणाम येण्याची शक्यता नाही. येस बँकच्या निकालात वार्षिक विकास दर वाढीव असण्याची शक्यता आहे. येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न स्थिर राहील, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. बँकेच्या व्याज मार्जिनमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. मार्च 2023 अखेर येस बँकेच्या शेअरधारकांची संख्या 50.57 लाखावर पोहचली आहे.

शेअरची लक्ष किंमत :
येस बँक स्टॉकबाबत तज्ञांनी 21 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. वेलवर्थ शेअर अँड स्टॉक ब्रोकिंगचे तज्ञ म्हणतात की, येस बँकचा टेक्निकल निर्देशक RSI कल सकारात्मक पाहायला मिळत आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये अल्पावधीत तेजी येण्याची शक्यता आहे. RSI निर्देशांक पाहता तज्ञांनी येस बँकेच्या स्टॉकवर 18.50 रुपये ते 21 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 14.40 रुपये प्रति शेअर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes bank Share Price Today on 21 April 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x