गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक’; अमेरिकेत गुन्हा दाखल

Gautam Adani | अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. अदानी यांचे पुतणे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह आणि एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह सिरिल कबानेस यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत.

एसईसीने बुधवारी या व्यक्तींवर सिक्युरिटीज आणि वायर फ्रॉड आणि सिक्युरिटीज फ्रॉड करण्याचा कट रचल्याचा आरोप लावला. हे आरोप कोट्यवधी डॉलरच्या योजनेशी संबंधित आहेत. खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने करून अमेरिकी गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय संस्थांकडून निधी गोळा केल्याचा आरोप आहे. भारत सरकारने अदानी ग्रीन आणि एज्योर पॉवरला दिलेल्या अब्जावधी डॉलरच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा फायदा घेण्यासाठी ही लाच देण्याची योजना आखण्यात आल्याचा आरोप एसईसीने केला आहे.

एसईसीच्या तक्रारीत म्हटले आहे की हे लोक फेडरल सिक्युरिटीज कायद्यांच्या फसवणूक विरोधी तरतुदींचे उल्लंघन करीत आहेत. एसईसीच्या निवेदनानुसार, या योजनेदरम्यान अदानी ग्रीनने अमेरिकन गुंतवणूकदारांकडून 175 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1,450 कोटी रुपये) पेक्षा जास्त रक्कम गोळा केली. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये एज्योर पॉवरचे शेअर्स ट्रेड करत होते.

न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट ऍटर्नी ऑफिसने गौतम अदानी, सागर अदानी, काबानीज आणि अदानी ग्रीन आणि एज्योर पॉवरशी संबंधित इतरांविरोधात फौजदारी आरोप दाखल केले आहेत. फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्टचे (एफसीपीए) उल्लंघन करून लाचेचा कट रचल्याचा आरोप आहे. 2020 ते 2024 या कालावधीत अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना 25 0 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त लाच दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लाच देण्यामागे सौर ऊर्जा प्रकल्प मिळविण्याचा हेतू होता. यामुळे पुढील २० वर्षांत २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे.

अदानी आणि त्यांच्या साथीदारांवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एफबीआयचे सहाय्यक संचालक जेम्स डेनेही म्हणाले की, प्रतिवादींनी न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता.

हे प्रकरण आता अमेरिकेतील मोठ्या कॉर्पोरेट फ्रॉड आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण बनले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना लाच देणे आणि अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | America claims that billionaire Gautam Adani charged with bribery and fraud 21 November 2024 Marathi News.