 
						Anant Raj Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनंत राज लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक टक्क्याच्या घसरणीसह 237.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबवात ट्रेड करत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अनंत राज लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7700 कोटी रुपये आहे.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 244 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 88 रुपये होती. मागील एका महिन्यात अनंत राज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना सात टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 71 टक्के परतावा दिला आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी अनंत राज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 237.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 3 वर्षात अनंत राज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1140 टक्के नफा मिळवून दिला आहे. अनंतराज लिमिटेड कंपनीने दक्षिण दिल्लीमध्ये मेहरौली आणि आंध्र प्रदेश राज्यात तिरुपती येथे नवीन प्रकल्प सुरू केल्याची घोषणा केली आहे.
दिल्ली एनसीआरमधील मेहरौली येथे अनंत राज लिमिटेड कंपनीने अनंत राज केंद्र नावाच्या नवीन प्रकल्पाची सुरुवात केली आहे. 7 लाख चौरस फुटांमध्ये बांधण्यात येणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये ऑफिस स्पेस, हॉस्पिटॅलिटी आणि सर्व्हिस अपार्टमेंट्स बांधण्यात येणार आहेत.
अनंत राज लिमिटेड कंपनीने तिरुपती आंध्र प्रदेश या ठिकाणी जय गोविंद गृह निर्माण लिमिटेड या संपूर्ण मालकीच्या युनिटद्वारे अनंत राज आश्रय-11 नावाचा गृहनिर्माण प्रकल्प बांधायला सुरुवात केली आहे. तिरुपतीच्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर 2 मध्ये या प्रोजेक्टचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पा.अंतर्गत 10 लाख चौरस फूट जागेवर भारतीय लोकांना परवडतील अशी घरे बांधण्याचे काम सुरू आहे.
अशोक सरीन यांनी 1985 साली अनंत राज लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी मुख्यतः IT पार्क्स, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्स, SEZ, ऑफिस कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल्स आणि निवासी प्रकल्प विकासाचे काम करण्याचा व्यवसाय करते.
ही कंपनी हरियाणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली एनसीआर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करते. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 137 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 1140 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		