15 December 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Jai Balaji Share Price | बालाजी पावला आणि लॉटरी लागली! जय बालाजी इंडस्ट्रीज शेअरने फक्त 6 महिन्यात 1100% परतावा दिला

Jai Balaji Share Price

Jai Balaji Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 620 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 50 रुपयेवरून वाढून 620 रुपये किमतीवर पोहोचली आहे.

सोमवारी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीने आपले सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीने 862 टक्के वाढीसह 202 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज स्टॉक 1.18 टक्के घसरणीसह 612.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील वर्षी याच तिमाही काळात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीने 22 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 च्या तिमाहीत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीने 170 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीने 1547 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. तर कंपनीचा एकूण महुसल 1,369 कोटी रुपये नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 13 टक्के अधिक आहे.

जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे इतर उत्पन्न 28 कोटी रुपये नोंदवले गेले आहे, ज्यात YOY आधारे 460 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर QOQ आधारे 250 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा 238 टक्के वार्षिक वाढून 213 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

जय बालाजी इंडस्ट्रीज ही कंपनी प्रामुख्याने स्टील क्षेत्रात व्यवसाय करते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 54.70 रुपयेवरून वाढून 620 रुपये किमतीवर पोहचली होती. या काळात गुंतवणूकदारांनी 1033 टक्के नफा कमावला आहे.

मागील तीन महिन्यांत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने अनुक्रमे 106.51 टक्के, 72.25 टक्के, आणि 61.38 टक्के नफा दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3,824 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 3,422 टक्के मजबूत झाली आहे.

ऑगस्ट 2023 च्या डेटानुसार जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांनी 60 टक्के भाग भांडवल धारण केले होते. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे अनुक्रमे 0.1 टक्के आणि 0.1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर किरकोळ शेअर धारकांनी या कंपनीचे 39.8 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Balaji Share Price NSE 18 October 2023.

हॅशटॅग्स

Jai Balaji Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x