
Andhra Cements Share Price | ‘आंध्र सिमेंट’ या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहे. या सिमेंट कंपनीच्या स्टॉकने आतापर्यंत 14 पेक्षा जास्त वेळा अप्पर सर्किट हीट केला आहे. 2 मार्च 2023 रोजी ‘आंध्र सिमेंट’ कंपनीचे शेअर्स 4.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 69.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका वर्षात ‘आंध्र सिमेंट’ कंपनीच्या शेअरने लोकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 1888 टक्के नफा कमावून दिला आहे. तर या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 69.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 4.90 रुपये होती. आंध्र सिमेंट कंपनीचे शेअर्स 2020 मध्ये 2.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2022 च्या शेवटी हा स्टॉक 6.03 रुपयांवर पोहोचला होता. आता हा स्टॉक 66 रुपये वर ट्रेड करत आहे.
2021 या वर्षात ‘आंध्र सिमेंट’ कंपनीचे शेअर्स 6.33 रुपये किमतीवर पोहचले होते. ज्या गुंतवणूकदारांनी 2020 मध्ये या स्टॉकमध्ये 2.04 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपये लावले होते, त्यांना दोन वर्षांत 9 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. 2022 मध्ये ‘आंध्र सिमेंट’ कंपनीचे शेअर्स 16.45 रुपयांवरून 5.91 रुपयांपरीत कमजोर झाले होते. या काळात ज्या लोकांनी शेअर्स खरेदी केले होते, त्यांना मोठा नुकसान सहन करावा लागत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.