 
						Angel One Share Price | एंजेल वन कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2884 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 4000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 40 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो. ( एंजेल वन कंपनी अंश )
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने आपल्या अहवालात एंजेल वन कंपनीच्या शेअर्सवर 4000 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी एंजेल वन स्टॉक 0.62 टक्के घसरणीसह 2,838.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
19 एप्रिल 2024 रोजी ICICI सिक्युरिटीज फर्मने एक अहवाल जाहीर करून एंजेल वन स्टॉकवर 3469 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 21 टक्के अधिक वाढू शकतात. मागील एका वर्षात एंजल वन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 131 टक्के परतावा कमावून दिला आहे. मात्र 2024 यावर्षात कंपनीचे शेअर्स 20.27 टक्के घसरले आहे.
मागील सहा महिन्यांत एंजेल वन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. एंजेल वन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3896 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1181.20 रुपये होती.
24 मार्च 2024 पर्यंत एंजेल वन कंपनीत प्रवर्तकांनी 38.21 टक्के भाग भांडवल धारण केले होते. 23 डिसेंबर 2023 रोजी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 19.11 टक्के भाग भांडवल धारण केले होते. 24 मार्च रोजी हे प्रमाण 17.27 टक्क्यांवर आले होते. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांचा वाटा मार्चमध्ये 9.49 टक्क्यांवर आला आहे. म्युच्युअल फंडांनी देखील आपला वाटा 7.26 टक्क्यांवरून कमी करून 6.99 टक्के केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		