2 May 2025 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मुख्यमंत्री शिंदे गणेश मंडळांना भेटी देऊन मार्केटिंग करत बसले | तिकडे गुजरातने महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या 1 लाख नोकऱ्या पळवल्या

Anil Agarwal

Vedanta Company | वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प आणि डिस्प्ले फॅब मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारशी सामंजस्य करार केला आहे. वेदांत या प्रकल्पात १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

वेदांत अध्यक्षांनी ट्विट करून दिली माहिती :
वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्याने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, “ऐतिहासिक प्रसंग. गुजरातमध्ये नवीन वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. कंपनीने 1.54 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक केल्याने भारताची आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे.

गुजरातमध्ये 1 लाख लोकांना रोजगार मिळेल :
यावेळी बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी दोन्ही कंपन्या १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या सुविधेमुळे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. “या प्रकल्पामुळे पंतप्रधान मोदी यांचे भारतात एक मजबूत उत्पादन आधार तयार करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल,” असे ते यावेळी म्हणाले. यामुळे आमची इलेक्ट्रॉनिक्स आयात कमी होईल आणि आमच्या लोकांना एक लाख थेट कुशल रोजगार मिळेल. त्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे पटेल म्हणाले.

महाराष्ट्र राज्यही या प्रकल्पासाठी मोठा दावेदार आणि स्पर्धक होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची दखल न घेता आणि पडद्यामागून गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेत गुजरातने महाराष्ट्राकडून हा प्रकल्प राजकीय कुरघोडीतून अक्षरशः ओढून घेतल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी हे प्रकरण मार्गी लावण्यात आलं असा रिपोर्ट आहे. विशेष म्हणजे यासाठी आयएएस लॉबी सुद्धा कामाला लावण्यात आली हाती आणि राज्यातील मंत्रालयाला ‘ राजकीय स्टॅन्ड बाय’ मोडमध्ये ठेवण्यात आले होते असं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळू नये यासाठीच शिंदे-फडणवीस सरकार कामं करतंय का अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की, ”वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Anil Agarwal company Vedanta will invest 154000 crore in Gujarat MoU sign check details 13 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Anil Agarwal(1)#Eknath Shinde(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या