 
						Anup Engineering Share Price | अनुप इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 6 मे रोजी अनुप इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 2,186.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( अनुप इंजिनिअरिंग कंपनी अंश )
आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. अनुप इंजिनिअरिंग कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4100 रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी अनुप इंजिनिअरिंग स्टॉक 3.57 टक्के घसरणीसह 1,990.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
या कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 27.4 टक्के वाढीसह 43 कोटी रुपये नफा कमावला आहे. एक वर्षभरापूर्वीच्या तुलनेत कंपनीचा EBIDTA 23.7 टक्क्यांनी वाढून 37.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या तिमाहीत कंपनीच्या कामकाजातील महसूल वाढून 156.9 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
2023-2024 या संपूर्ण आर्थिक वर्षात अनुप इंजिनिअरिंग कंपनीने 550.4 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा महसूल 33.8 टक्के वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये कंपनीने 411.3 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
दरम्यान कंपनीचा EBIDTA वार्षिक 53.3 टक्क्यांच्या वाढीसह 126.8 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी कंपनीचा EBITDA 82.7 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीने 103.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
अनुप इंजिनिअरिंग कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठी गुंतवणुकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 15 रुपये अंतिम लाभांश आणि 5 रुपये विशेष लाभांश वाटप केला आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 20 रुपये एकूण लाभांश वाटप करणार आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश वाटपाचा प्रस्ताव मंजूर केला जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		