
Apar Industries Share Price Today | ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चार गुणाकार केले आहेत. एक वर्षापूर्वी ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 669 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 2,810 रुपये किमतीवर पोहचला आहे. (Apar Industries Limited)
मागील एका वर्षात ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 326 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 54.04 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही एक वर्षापूर्वी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.19 लाख रुपये झाले असते.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘अपार इंडस्ट्रीज’ या मिडकॅप कंपनीचे बाजार भांडवल 10,756 कोटी रुपये आहे. ही जगातील सर्वात मोठी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मानली जाते. ही कंपनी ट्रान्सफॉर्मर तेलाची तिसरी सर्वात मोठी उत्पादक कंपनी मानली जाते. यासह ही कंपनी भारतातील सर्वात मोठी अक्षय केबल कंपनी आणि पॉलिमर, वंगण उत्पादन करणाऱ्या कंपन्यापैकी एक आहे.
कंपनी काही प्रमाणात पुरवठा करण्याच्या व्यवसायात ही गुंतलेली आहे. ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनी आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल 8 मे 2023 रोजी जाहीर करणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकदार आणि तज्ञ कंपनीच्या चांगल्या तिमाही निकालांची अपेक्षा करत आहेत.
डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल :
अपार इंडस्ट्रीज कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत वार्षिक 76.9 टक्के वाढीसह 3,942 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या तिमाहीत कंपनीचा EBITDA 199 टक्क्यांच्या वाढीसह 349 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 3.60 टक्क्यांच्या वाढीसह 8.8 टक्के नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.