
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स बोनस म्हणून ट्रेड करत होते. आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर वाटप केले आहेत. आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर म्हणजे शेअर 10 रुपयांपेक्षा स्वस्त आहे. (Ashirwad Capital Share Price BSE)
शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत
त्याच वेळी13 जून 2023 पासून आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 4.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोनस शेअर्स बाबत माहिती दिली
5 जून 2023 रोजी आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीने सेबीला बोनस शेअर्स बाबत माहिती दिली होती. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत 19 जून 2023 हा दिवस बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख कळवली होती. आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
13 जून 2023 रोजी आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. एका महिन्याभरापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 19 टक्क्यांनी वाढले आहेत.
52 आठवड्यांची पातळी
मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने लोकांना 39.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. आशीर्वाद कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7.80 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 3.73 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.