 
						Ashnisha Industries Share Price | अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 18.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 191 कोटी रुपये आहे.
अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 25.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4.31 रुपये होती. अश्निषा इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः पोलाद आणि पोलाद मिश्र धातुंच्या उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. अश्निषा इंडस्ट्रीज या कंपनीचे जुने नाव आशानिषा अलॉयज लिमिटेड असे होते. आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी अश्निषा इंडस्ट्रीज स्टॉक 3.01 टक्के वाढीसह 19.19 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
GCL ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीने 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कामकाजी महसूल आणि निव्वळ नफ्यात चांगली वाढ नोंदवली आहे. अश्निषा इंडस्ट्रीज कंपनी आता सौर ऊर्जा व्यवसायात देखील विस्तार करणार आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर 45 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असा तर तुम्ही, नुकताच सौर ऊर्जा निर्मिती व्यवसायात उतरलेल्या अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता.
मागील 6 महिन्यांत अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 340 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील वर्षी 12 ऑक्टोबर 2022 रोजी अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.31 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता स्टॉक 500 टक्के वाढून 19 रुपये किमतीवर पोहचला आहे.
4 डिसेंबर 2020 रोजी अश्निषा इंडस्ट्रीज स्टॉक 18 पैशांवर ट्रेड करत होता. या किमतीवरून शेअरची किंमत 10500 टक्के वाढली आहे. 3 ऑगस्ट 2018 रोजी अश्निषा इंडस्ट्रीज स्टॉक 1.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून हा स्टॉक 1900 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		