
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 258.45 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवारी या स्टॉकमध्ये फारशी उत्साहवर्धक कामगिरी पाहायला मिळाली नाही. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के नफा कमावून दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने या स्टॉकवर ‘टॅक्टिकल बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, हा स्टॉक 284 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.100 टक्के वाढीसह 250.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या मते, व्यावसायिक वाहन क्षेत्रामध्ये सौम्य घसरण पाहायला मिळू शकते. वाहन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या उद्योगानी आपल्या मार्जिन सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की महागाई वाढ, वाहनाच्या किमतीतील वाढ यासारख्या घटकांमुळे कंपन्यांचा मार्जिन वाढू शकतो. अशोक लेलँड ही वाहन उत्पादन कंपनी S&P BSE- इंडेक्सचा भाग आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 73,572.19 कोटी आहे.
मागील गेल्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्क्यांनी वाढली आहे. मागील तीन महिन्यांत आणि सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 30 टक्के आणि 43.5 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 36 टक्के वाढवले आहेत. मागील पाच आणि 10 वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 264 टक्के आणि 639 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.