3 May 2025 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीची उपकंपनी हिंदुजा टेक लिमिटेडने जर्मन कंपनी TECOSIM चे अधिग्रहण करण्यासाठी करार केला आहे. यामुळे पुन्हा एकदा अशोक लेलँड स्टॉक फोकसमध्ये आला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड कंपनीने सेबीला माहिती दिली की, या अधिग्राहणामुळे हिंदुजा टेक कंपनीचे युरोप आणि आंतरराष्ट्रीय बाजारात व्यावसायिक अस्तित्व आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

या करारामुळे कंपनी युरोपमधील आपल्या ग्राहकांना उत्तम दर्जाच्या सेवा प्रदान करू शकेल. याच बातमीच्या पार्श्वभूमीवर अशोक लेलँड स्टॉक गुरूवारी 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 228.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 1.06 टक्के घसरणीसह 225.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अशोक लेलँड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, 2024-25 मध्ये TECOSIM समूहाची आर्थिक उलाढाल 40 दशलक्ष डॉलर्स असेल. ही कंपनी आपल्या ग्राहकांना ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कराराची अंमलबजावणी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत केली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या अधिग्रहण कराराचे एकूण मूल्य 21 दशलक्ष युरो असेल.

हा करार अशोक लेलँड कंपनीच्या वतीने हिंदुजा टेक GMBH ही उपकंपनी करणार आहे. ही कंपनी TECOSIM कंपनीचे 100 टक्के भागभांडवल खरेदी करून कंपनीचे अधिग्रहण पूर्ण करेल. TECOSIM ही कंपनी जर्मनी, यूके, भारत, जपान, रोमानिया आणि यूएसए यासारख्या देशात व्यवसाय करते. हे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, दोन्ही कंपन्या एक वर्षाच्या आत आपले संसाधने एकत्र करतील आणि पुढील धोरणानुसार व्यवसाय करतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 19 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या