
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या काही दिवसात 175 रुपये किमतीवरून 243 रुपये किमतीवर उडी घेतली आहे. जर तुम्ही या स्टॉकचा टेक्निकल चार्ट पाहीला तर तुम्हाला समजेल की, या स्टॉकमध्ये गुंतवणुकदारांना पुन्हा एकदा एन्ट्री घेण्याची संधी मिळू शकते. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 1.22 टक्के घसरणीसह 232.78 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड स्टॉक 235.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अशोक लेलँड स्टॉकमध्ये 216.18 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. ही पातळी शेअरची स्टॉपलॉस लेव्हल म्हणून काम करू शकते. गुंतवणूकदार हा स्टॉक खरेदी करताना 216.18 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावू शकतात. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 230 रुपये ते 240 रुपये ट्रेडिंग रेंज दरम्यान व्यवहार करत होता. या किंमत पातळीवर गुंतवणुकदारांना एन्ट्री घेण्यासाठी एक मजबूत संधी मिळू शकते.
अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 242.69 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 157.55 रुपये होती. तज्ञांच्या मते, या स्टॉकची पहिली टार्गेट प्राइस 250 रुपये आणि दुसरी टारगेट प्राइस 260 रुपये असू शकते. शेअर बाजारातील 26 तज्ञ आणि गुंतवणूक सल्लागार अशोक लेलँड स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करत आहेत.
हा स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 69160 कोटी रुपये आहे. अशोक लेलँड कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 2.38 टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.