
Ashok Leyland Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. देशांतर्गत स्टॉक मार्केटमधील सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मंगळवारी दिवसभरात बीएसई सेन्सेक्स २०० अंकांच्या वाढीसह ७६५०० च्या वर पोहोचला होता. या तेजीत मिरे अॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
अशोक लेलँड शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी अशोक लेलँड शेअर 3.61 टक्क्यांनी वाढून 209.75 रुपयांवर पोहोचला होता. अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 264.65 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 157.55 रुपये होता. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 61,652 कोटी रुपये आहे.
मिरे अॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्म – अशोक लेलँड शेअर टार्गेट प्राईस
मिरे अॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे अॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह २४० ते २४३ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
मिरे अॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे निकाल कमकुवत असूनही उच्च-मार्जिन विभागांवर कंपनीचे लक्ष केंद्रित केल्याने कंपनीला हेल्दी नफा राखण्यास मदत झाली आहे. कंपनीच्या कमर्शिअल वाहन उद्योगात सुधारणा होत असल्याने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी येत्या काही महिन्यांत सतत वाढीसाठी चांगल्या स्थितीत असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.