Asian Hotels North Share Price | अवघ्या पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 65 टक्के वाढले, हा शेअर खरेदी करावा का?

Asian Hotels North Share Price | दिल्ली स्थित ‘हयात रीजेंसी हॉटेल’ ची मालकी असलेल्या ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसात ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीचे शेअर्स 65 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर 113.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीच्या शेअर्सने 31 मार्च 2023 रोजी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Asian Hotels North Limited)

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 24 मार्च 2023 रोजी ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीचे शेअर्स 69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 31 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 10 टक्के वाढीसह 113.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीचे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 64.20 टक्के वधारले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 66.60 रुपये होती. ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीमध्ये प्रवर्तकनी एकूण 50.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

श्याम जाटिया फॅमिली ट्रस्टने ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीचे 1 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे. ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॉक डील पार पडली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार, श्याम जाटिया फॅमिली ट्रस्टने 29 मार्च 2023 रोजी ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीचे 100000 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. ही बल्क डील 99.95 रुपये प्रति शेअर या किमतीवर पार पडली होती. एशियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत या वर्षी आतापर्यंत 39 टक्के वृध्दी पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत सुमारे 33 टक्के मजबूत झाली आहे. मागील 1 महिन्यात ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 57 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Asian Hotels North Share Price on 01 April 2023.