 
						Astral Share Price Today | ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ या प्लास्टिक पाईप आणि पाण्याची टाकी बनवणाऱ्या कंपनीने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल बनवले आहे. या कालावधीत ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 33 रुपयांवरून वाढून 1400 रुपयांवर पोहचले आहेत. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 4 वर्षात आपल्या शेअर धारकांना 3 वेळा मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले होते. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढवून 95 लाख रुपये केले आहे. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1990.50 रुपये होती. मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.100 टक्के घसरणीसह 1,452.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Astral Limited)
1 लाखावर दिला 96.7 लाख रुपये परतावा :
12 एप्रिल 2013 रोजी ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 33.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 एप्रिल 2023 रोजी ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1449.45 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीने सप्टेंबर 2019 पासून तीन वेळा मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले आहेत. जर तुम्ही 12 एप्रिल 2013 रोजी एस्ट्रल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 लाख रुपयांना खरेदी केले असते, तर आज तुम्हाला 96.7 लाख रुपये परतावा मिळाला असता.
5 वर्षात दिला 249 टक्के परतावा :
‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 250.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 एप्रिल 2018 रोजी ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 416.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 एप्रिल 2023 रोजी बीएसई येथे 1454 रुपयांवर पोहोचला आहे. मागील 3 वर्षात ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत 185 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1188 रुपये होती. तर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 38,994 कोटी रुपये आहे.
बोनस शेअरचे तपशील :
‘ऍस्ट्रल लिमिटेड’ या कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 3 वेळा मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीने सप्टेंबर 2019 मध्ये 1 : 4 या प्रमाणात मोफत बोनस शेअरचे वाटप केले होते. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीने मार्च 2021 मध्ये 1 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स दिले होते. त्याच वेळी कंपनीने मार्च 2023 मध्ये देखील 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप केले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		