
Avantal Share Price | सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अवंटेल लिमिटेड कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने जून तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अवंटेल लिमिटेड कंपनीने 155 टक्क्यांच्या वाढीसह 69 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी अवंटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.37 टक्के वाढीसह 868.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. अवंटेल लिमिटेड कंपनीचा ऑपरेटींग प्रॉफिट 14 कोटी पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत अवंटेल लिमिटेड कंपनीने 8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. अवंटेल लिमिटेड कंपनीने आपल्या मल्टीबॅगर परतावा कमवून देऊन श्रीमंत केले आहे.
17 जुलै 2020 रोजी अवंटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 816 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील.3 वर्षांच्या कालावधीत अवंटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात अवंटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 233.55 टक्के वाढली आहे.
अवंटेल लिमिटेड ही मायक्रोवेव्ह सबसिस्टम्स, डिजिटल रेडिओ आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीमची तज्ञ उत्पादक कंपनी मानली जाते. हीकंपनी सॉफ्टवेअर सोल्यूशन्सशी संबंधित सेवा पुरवण्याचे काम देखील करते.
अवंटेल लिमिटेड ही कंपनी आपली उत्पादने संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना पुरवण्याचे काम करते. ही कंपनी भारतातील आणि जगभरातील अनेक सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना देखील आपले सेवा आणि उत्पादने प्रदान करण्याचे काम करते. अवंटेल लिमिटेड ही विशाखापट्टणममधील नोंदणीकृत कंपनी आहे. ही कंपनी दोन दशकांहून अधिक काळापासून व्यवसायात सक्रिय आहे.
कंपनी भारतीय लष्कर, भारतीय रेल्वे, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, इस्रो, डीआरडीओ, गोवा शिपयार्ड लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो यासारख्या दिग्गज संस्थांना आपल्या सेवा प्रदान करते. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी अवंटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 891 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि 900 रुपये या उच्चांक पातळीवर पोहोचले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.