
Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स या सागरी अन्न उत्पादन व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 13 वर्षात अवंती फीड्स या कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 440 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात अवंती फीड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21000 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
अवंती फीड्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. ज्या लोकांना बोनस शेअर्सचा लाभ झाला होता, त्यांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य आता 3 कोटींपेक्षा जास्त झाले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 0.94 टक्के वाढीसह 442.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अवंती फीड कंपनीचे शेअर्स 17 सप्टेंबर 2010 रोजी 2.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 441.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अवंती फीड्स कंपनीने जून 2018 मध्ये आपल्या पात्र शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.
कंपनीने गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत दिला होता. ज्या लोकांनी 17 सप्टेंबर 2010 रोजी अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 49260 शेअर्स मिळाले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर त्यांच्या शेअर्सची एकूण संख्या 73890 वाढली होती. सध्याच्या शेअर्सच्या किमतीनुसार गुंतवणूकदारांच्या सर्व शेअर्सचे मूल्य 3.26 कोटी रुपये झाले आहे.
मागील 10 वर्षांत अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3700 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 16 ऑगस्ट 2013 रोजी अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 11.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 441.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3770 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 504.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 321.15 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6015 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.