25 March 2025 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS Rattan Power Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक, यापूर्वी 586 टक्के परतावा दिला, पॉवर कंपनी फोकसमध्ये - NSE: RTNPOWER IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA Wipro Share Price | विप्रो शेअर मालामाल करणार, CLSA ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या – NSE: WIPRO
x

LIC Share Price | एलआयसी कंपनीला मोठा दणका, LIC शेअरवर याचा काय परिणाम होणार? शेअरबाबत काय सांगतात तज्ज्ञ?

LIC Share Price

LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. या कंपनीचा शेअर 0.67 टक्के घसरणीसह 646.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मात्र LIC स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे बिहार राज्य सरकारच्या कर अधिकाऱ्यांनी एलआयसी कंपनीला 290 कोटी रुपयेची नोटीस पाठवली होती.

बिहार राज्याच्या GST अधिकार्‍यांनी एलआयसी कंपनीवर विमाधारकाकडून प्रीमियम पेमेंटवर घेतलेले इनपुट टॅक्स क्रेडिट परत न केल्याचा आणि इतर काही नियमांच्या उल्लंघनांचा आरोप केला आहे. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 0.085 टक्के वाढीसह 647.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एलआयसीचे स्पष्टीकरण
एलआयसी कंपनीने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निवेदन जाहीर करून कळवले की, बिहार पटना जीएसटी प्राधिकरणकडून प्राप्त झालेल्या 290 कोटी रुपये मूल्याच्या कर नोटीसविरुद्ध एलआयसी कंपनी अपील दाखल करणार आहे.

एलआयसी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले की, बिहार राज्य पटना अतिरिक्त राज्य कर आयुक्त अपील विभाग, यांनी व्याज आणि दंडासह GST भरण्याची मागणी केली आहे. या नोटिसीच्या विरोधात एलआयसी कंपनीने निर्धारित वेळेत GST अपीलीय न्यायाधिकरणात अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

जून तिमाही कामगिरी
एलआयसी कंपनीने सेबीला कळवले की, जून 2023 तिमाहीत एलआयसी कंपनीने 1,88,749 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून 2022 तिमाहीत एलआयसी कंपनीने 1,68,881 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जून 2022 मध्ये पहिल्या वर्षाचा प्रीमियम 7,429 कोटी रुपयांवरून घसरून जून 2023 तिमाहीमधे 6,811 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. एलआयसी कंपनीचा IPO मे 2022 शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. आणि कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 949 रुपये निश्चित केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price today on 26 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या