12 December 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Investment Plan | हमखास कमाई, फक्त एक वेळ गुंतवणूक करा आणि पैसा होईल डबल, गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्ण संधी,

Investment plans

Investment Plan | कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला या योजना खात्यात नॉमिनी नामनिर्देशित करण्याचीही सुविधा मिळते. एवढेच नाही तर तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हे योजना खाती ट्रान्सफर करू शकता.

सरकारी योजना:
जर तुम्हाला पैसे गुंतवून जबरदस्त परतावा कमवायचा असेल, परंतु बाजारातील जोखमीची भीती वाटत असेल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त सरकारी योजनां गुंतवणुकीचा चांगला पर्याय देत आहे. जेव्हा जेव्हा आपण सरकारी योजनांबद्दल चर्चा करतो, तेव्हा पोस्ट ऑफिस लघु बचत योजना सुरक्षित आणि हमी परताव्याचा जबरदस्त पर्याय उपलब्ध करून देते. पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही देखील अशीच एक लघु बचत योजना आहे, ज्यामध्ये काही वर्षानंतर तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट होतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किसान विकास पत्र योजना जबरदस्त आहे. यामध्ये तुमचे गुंतवणूक केलेले पैसे नेहमीच पूर्णपणे सुरक्षित असतात. या योजनेत गुंतवलेले ग्राहकाचे पैसे 124 महिन्यांत दुप्पट होतात. तसेच तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहील आणि हमखास परतावा देईल.

किसान विकास पत्र :
ही एक अशी योजना आहे ह्यात एकदा गुंतवणूक करा आणि दीर्घ काळासाठी विसरून जा. ही योजना तुम्हाला हमखास परतावा देणार. किसान विकास पत्र ही अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी पैसे दीर्घ काळासाठी गुंतवू शकता आणि 10 वर्ष 4 महिन्यांनंतर म्हणजेच 124 महिन्यांनंतर तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट होतील. सध्या किसान विकास पत्रावरील व्याज परतावा दर वार्षिक 6.9 टक्के आहे. ह्या योजनेत चक्रवाढ व्याज दराने दरवर्षी व्याज परतावा दिला जातो. किसान विकास पत्र मध्ये प्रमाणपत्राच्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते. यामध्ये तुम्ही किमान 1,000 रुपये आणि नंतर 100 रुपयेच्या पटीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

खाते उघडण्याची पात्रता :
18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही भारतीय व्यक्ती किसान विकास पत्र मध्ये आपले खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकते. योजनेचे खाते उघडण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा उपलब्ध नाही. या योजनेत अल्पवयीन व्यक्तीच्या नावानेही गुंतवणूक करता येते. 10 वर्षांवरील अल्पवयीन मुले योजनेत खाते स्वतःच्या नावाने उघडून गुंतवणूक करू शकतात. NRI व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाही.

किसान विकास पत्र खरेदी करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता. तुम्हाला या खात्यात नॉमिनी चे नाव दाखल करण्याची ही सुविधाही दिली जाते. एवढेच नाही तर तुम्ही एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे खाती आरामशी ट्रान्सफर करू शकता. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडेही बिनदिक्कत हस्तांतरित केले जाऊ शकते.

गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नसल्यामुळे या योजनेत मनी लाँडरिंगचा कोणताही धोका नाही. म्हणून सरकारने 2014 मध्ये एक नियम केला होता की 50000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीकडे पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे. 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असल्यास आयटीआर, सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट यांसारखे उत्पन्नाचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे. याशिवाय ओळखपत्र म्हणूनही आधार कार्ड देणे गरजेचे आहे. या योजनेची सुरुवात 1988 मध्ये झाली होती. देशभरातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस शाखांमध्ये किसान विकास पत्रामध्ये गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment plans in government schemes for long term benefits on 17 August 2022.

हॅशटॅग्स

investment plans(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x