
Axis Bank FD Interest | खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीच्या दरात 5 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवे दर 21 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. अॅक्सिसअॅक्सिस बँकेच्या ऑनलाइन एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5000 रुपये जमा करावे लागतील.
अॅक्सिस बँक 7 दिवसते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 3.50 टक्क्यांपासून 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. २ वर्षे ते ३० महिन्यांच्या मुदतीच्या एफडीवर बँक सर्वाधिक ७.२० टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीच्या एफडीवर ७.९५ टक्के दराने व्याज मिळणार आहे.
अॅक्सिस बँकेचे नवे एफडी दर
7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज मिळणार आहे. ४६ दिवस ते ६० दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर बँक ४ टक्के व्याज देईल. 61 दिवस ते 3 महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर 4.50 टक्के व्याज मिळेल. 3 महिने ते 6 महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर आता 4.75 टक्के व्याज मिळणार आहे. अॅक्सिस बँक ६ महिने ते ९ महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर ५.७५ टक्के व्याज देणार आहे. 9 महिने ते 1 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 6 टक्के व्याज मिळणार आहे.
रेपो दरवाढीचा वेग मंदावला
नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. खरं तर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एमपीसी बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वी आरबीआयने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत रेपो दरात 2.50 टक्के वाढ केली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.