
Balkrishna Industries Share Price | भारतीय टायर निर्माता कंपनी ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ च्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना दीर्घ काळात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 2000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने लोकांना 110000 टक्के नफा कमावून दिला आहे.
शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2490 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1801 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के घसरणीसह 2,220.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअरने गुंतवणूकदारांना 110643 टक्के परतावा दिला
30 मे 2003 रोजी बालकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.07 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात ज्या लोकांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 11 कोटी रुपये झाले आहे. 29 मे 2023 रोजी हा स्टॉक 2315.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2003 पासून ते 2023 पर्यंत बालकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110643 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 30 मे 2003 रोजी बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.18 कोटी रुपये झाले असते.
बालकृष्ण इंडस्ट्रीज शेअर्सवर परतावा
बालकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 22 मे 2009 रोजी 26.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 29 मे 2023 रोजी 2315.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 8770 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 22 मे 2009 रोजी बालकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 88.45 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.