
Balu Forge Share Price | बालु फोर्ज इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना अद्भूत नफा कमावून दिला आहे. बालु फोर्ज इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरची किंमत मागील 6 महिन्यांत 170 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. या कालावधीत बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 60 रुपयेवरून वाढून 160 रुपयेच्या पार गेले आहेत. (Balu Forge Share Price Today)
दिग्गज गुंतवणूदार आशिष कचोलिया यांची शेअरमध्ये मोठी गुंतवणूक
बातमीनुसार शेअर बाजारातील दिगाज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांनी देखील बालु फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी बालु फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.83 टक्के वाढीसह 165.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचौलिया यांनी बालु फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे प्रीफरेन्शियल शेअर खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. आशिष कचोलिया यांनी बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 2165500 शेअर्स खरेदी केले आहेत. कचोलिया व्यतिरिक्त, बेंगाल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट् प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बालु फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 2165500 प्रीफरेन्शियल शेअर खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. याचे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 2.16 टक्के आहे. सेज वन फ्लॅगशिप ग्रोथ 2 फंडाने देखील बालु फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 1800000 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.
6 महिन्यांत 170 टक्के परतावा
बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 172 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी बालु फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 60.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 22 जून 2023 रोजी 167.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 169.95 रुपये होती. तर बालु फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची नीचांकी किंमत पातळी 52 रुपये होती. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.75 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.