3 May 2024 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 50 रुपये गुंतवून मिळवा 35 लाखाचा परतावा, त्यासोबत इतर आर्थिक लाभही मिळतील

Post Office Investment

Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफीसतर्फे ग्राहकांसाठी विविध गुंतवणूक योजना राबवल्या जातात. या गुंतवणूक योजना आर्थिक सुरक्षेसोबत खात्रीशीर परतावाही मिळवून देतात. इंडिया पोस्ट ऑफिस अल्प बचत योजनेतील गुंतवणूक केल्यास हमखास परतावा दिला जातो, म्हणजेच पोस्ट ऑफिसची ही गुंतवणूक योजना बाजाराच्या जोखमीच्या अधीन नाही. आपण ज्या योजनेची चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे, ‘ग्राम सुरक्षा योजना’.

ग्राम सुरक्षा योजना :
पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना कमी जोखीम आणि अप्रतिम परतावा प्रदान करते. या योजनेत गुंतवणूकदारांनी दर महिन्याला 1500 रुपये जमा केल्यास योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर त्यांना 31 ते 35 लाख रुपये परतावा मिळेल. अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना छोटी बचत करून गुंतवणूक करता यावी यासाठी इंडिया पोस्ट ऑफिस तर्फे ग्राम सुरक्षा योजना राबवली जाते.

पात्रता आणि वय मर्यादा :
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वय मर्यादा किमान 19 वर्ष ते कमाल 55 वर्षे दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. या गुंतवणूक योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. शिवाय या योजने अंतर्गत 10 लाख रुपयेची जीवन विमा सुरक्षा प्रदान केली जाते. गुंतवणुकदार पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत मासिक, तिमाही, सहामाही, किंवा वार्षिक प्रीमियम जमा करू शकतात. या योजनेत प्रीमियम पेमेंट करण्यासाठी गुंतवणूकदाराना 30 दिवसांची मुदत दिली जाते.

कर्ज सुविधा :
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजने अंतर्गत गुंतवणूकदारांना गरजेच्या वेळी कर्ज घेण्याची परवानगीही दिली जाते. तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जही घेऊ शकता. एकदा या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यास तुम्ही 3 वर्षानंतर पॉलिसी रद्द करू शकता. मात्र तीन वर्षाआधी योजना रद्द केल्यास तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

दररोज 50 रुपये जमा करून 35 लाख रुपये परतावा कसा मिळवायचा :
या योजनेत नियमित गुंतवणुक केल्यास मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. समजा तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी दरमहा 1515 रुपये जमा करून 10 लाख रुपयांच्या विमा रकमेसह ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक सुरू केली तर 55 व्या वर्षी तुम्हाला 31.60 लाख रुपये परतावा मिळेल. जर तुम्ही दर महिन्याला 1463 रुपये जमा केले तर वयाच्या 58 व्या वर्षी तुम्हाला 33.40 लाख रुपये परतावा मिळेल. आणि दर महिन्याला 1411 रुपये जमा केले तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला 34.60 लाख रुपये परतावा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Investment in Gram suraksha Yojna Benefits and return for long term investment on 16 October 2022.

हॅशटॅग्स

Post Office Investment(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x